Friday, September 10, 2010

मनातली हिरवळ

ओरिगामी हा माझा soft corner असलेला विषय म्हणून त्यावर आत्ता पर्यंत लिहिले.असो . आता त्या गंभीर गप्पांमधून थोडी बाहेर येते. मला कविता करायला पण फार आवडतात हा! गम्मत असते त्यातही एक. म्हणजे 'मनाची भाषा" मांडता येते ती निव्वळ आणि निव्वळ  कवितेतूनच. कोल्हापूरच्या आमच्या शेतात एकटीच बसायला मला आवडते. हा आता कविता म्हणजे पाउस  असायला हवा असे थोडीच आहे! अहो, पाउस जर तुमच्या"मनात" झिरपत असेल न तर कडकडीत उन्हात सुद्धा गारवा भासतो. प्रेमात पडला असाल तर तळ्यावर पडलेली सुर्याकीराणांची तिरीपसुद्धा तुम्हाला पिसारा  फुलवलेल्या मोरासारखी डौलदार वाटते दोन स्वतःशीच गुंतून जाऊन हलक्या हातांनी खुद्लेले गवताचे पाते वाळलेले असले तरी त्याचा स्पर्श ओढ लावणारा ठरतो  आणि  सारे रान भर उन्हाळ्यात सुद्धा हिरवे वाटू लागते कारण असते ती फक्त तुमच्या 'मनातील हिरवळ' !हो हो अशीच माझी कविता! 
 
वेल बहरली हिरवी सुंदर,
पाउस पडता झाली कलंदर
क्षणात होई हिरवीगार
उभा ठाके
तो मेघ दरबार !!
.........................................................................................................



फुलाचे मन जाणून घ्यायला 'सुगंध' व्हायला हवं
काटेरी झुद्पाचे मन जाणून घ्यायला त्यात 'घर' वसवायला हवं

माती
चं मन जाणून घ्यायला 'आभाळ' व्हायला हवं
आभाळाचा मन जाणून घ्यायला 'मनावरले मळभ' दूर करायला हवं

माणसाचं मन जाणून घ्यायला 'माणूस' व्हायला हवं,
खरखुरं आयुष्य जगताना आनंदी बीजा
चं असं 'वृक्षात रुपांतर' व्हायला हवं !

तेजा
बांदल