Wednesday, August 4, 2010

ओरिगामी........माझ्या मनातली


माध्यम -"कागद", art tool - "हाताची दोन बोटे" विषय- "वस्तुनिष्ठ असा कोणताही" साध्य "आकर्षक बनणारी कलाकृती " कलेचे नाव "ओरिगामी"
एका नामवंत कलाकारांनी तार्किक पद्धतीने जतन केली गेलेली सुप्रसिद्ध कला तथा गणितीशास्त्र होय. 2D आणि 3D ओरिगामी आज जगभर प्रसिद्ध आहे. एका चौरस कागदाला वेगवेगळ्या प्रकारे "घड्या" घातल्या जातात. त्यामध्ये कात्रीचा आणि डिंकाचा वापर न करता त्या ठराविक आकाराद्वारे, मोडेल द्वारे विविध विषयाची मांडणी केली जाते. रंगेबिरंगी कागद, त्याचे आकार, अगदी सोपे कमी घड्या असलेले पक्षी-प्राणी ओरिगामी कलेमध्ये सहज बनवता येतात.
मोठी अजब कला आहे ही. डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही इतके मोहक आकार फक्त एका चौकोनी कागदातून बनवता येतात. व्वा...जेव्हा माझ्या मनाशीच विचार करते तेव्हा माझे पहिले प्रेम संगीत असले तरी बरोबरीची जागा "ओरिगामी" या कलेला द्यावीशी वाटते. खूप खूप मोठा कॅनव्हास आहे हो या कलेचा.....ओरिगामी बद्दल च्या माझ्या भावना,माझा खारीच्या वाट्या प्रमाणे असलेला प्रयत्न,त्यातून मिळालेला आत्मविश्वास हा एका लेखातून मांडणे अगदी अशक्य. ओरिगामी संबंधीचा इतिहास जपान मध्ये झालेले विकासाचे टप्पे, या कलेतील अभ्यासपूर्णता,गणितीशास्त्र, तार्किकता या बद्दल क्रमाक्रमाने लिहित जाईन मी. छोटासा "प्रयत्न" करायला काय हरकत आहे? मित्रांनो, जर आपण इतर ललित कलांना आपल्या जीवनात, संस्कृती मध्ये इतके महत्व देतो, वाव देतो तर या कलेला देखील शक्य तितका नक्की द्यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. चित्रकलेच्या पंगतीत नक्की एक दिवस ओरिगामी ही कला बसेल यासाठी आत्तापासून प्रयत्न करायला हवा, त्याची विविधता लोकांसमोर मांडायला हवी.
संगीत, साहित्य, काव्य, चित्र या कलेच्या शाखांमध्ये प्रत्येकाची अशी विशिष्ठ "शैली" बनलेली असते. ओरिगामी मध्ये देखील अशी शैली पहावयास मिळते. ती "ओळखता" येण्यासाठी मात्र अनेक ओरिगामी मोडेल्स पाहणे आवश्यक असते. john montroll, Robert Harman,Eric, kusudamas अशा कलाकारांची ही शैली बनली आहे. या कलाकारांनी बनवलेल्या कलाकृतींचा आपण अवश्य आस्वाद घ्यावा. आपली रसिकता तसेच कुतूहल हे नेहमी सजग असावे अशी सहज आणि आनंदी इच्छा.

3 comments:

  1. Hi Teja!
    नेमक्या शब्दात ओरिगामी समजावल्याबद्दल तुझे आभार!
    ओरिगामी कुणाच्या इतक्या आवडीचा विषय असू शकेल हा विचार नव्हता केला मी!
    तुझ्या वेगवेगळ्या कलाकृती पहायला नक्की आवडेल!

    ReplyDelete
  2. bagh kalemadhe jar aaplyala doghanvar prem hou shakata tar kharya aayushyamadhe ekaach mulibarobar
    sagla aayushya kadhana kiti avaghad e... ;) hehe

    ReplyDelete
  3. aho bandhuraaaje, jara sambhalun...japun...japun

    ReplyDelete