Monday, August 16, 2010

लहान मुलात दंग मी.........

परवा एका शाळेत गेले होते. guest lecturer म्हणून मी तिथे बर्याचदा ओरिगामी शिकवली आहे. अचानक एक मुलगा एक पक्षी घेऊन माझ्याकडे आला...ओरिगामी मध्ये बनवलेला पक्षी होता तो. अनेकदा शिकवून त्याला तो जमला नव्हता. आज तो खूप खुश दिसत होता. अर्थातच मला भेट म्हणून तो पक्षी द्यायला पळत पळत आला. पक्षी तसा साधा सोपा. पण रंग, घड्यांचे नियम सांभाळून केलेला पक्षी मला विशेष भावला. त्याच्या वर्गात गेले. तर तसे अनेक पक्षी विविध रंगात बनवून कमी अधिक उंचीच्या दोऱ्यानेभिंतीला टांगले होते. त्याची "रचना" फारच सुंदर केली होती. मला बरेच उशिरा समजले कि या मुलाला बोलता, ऐकता येत नाही. या ओरिगामी च्या दुनियेतून बाहेर यायलाच तो तयार नाही तो उत्तम चित्रकारही आहे.त्याची "कल्पनाशक्ती हीच त्याची ओळख आहे. जी ओरिगामी मध्ये देखील महत्वाची आहे. त्याची "हाताची बोटे "कलात्मकरित्या चालतात.त्यामुळे तो ओरिगामी, painting मध्ये जास्त रमतो. त्यातून बाहेरच येत नाही अशी त्याच्या आई ची तक्रार पण माझ्या कानावर आली. पण त्या तक्रारीमध्ये त्या आईच्या डोळ्यात आनंद होता. तक्रारीमधील "गोडवा , आनंद " मी प्रथमच अनुभवला.एक्कड्या बोलता ऐकता न येणाऱ्या मुलाला इतर मुले जवळ करत नाहीत परंतु कलामाध्यमाने आज तो इतर मुलांच्या वरचे स्थान मिळवतो.याला कारण होते ते म्हणजे योग्य वेळी मिळालेली रंगेबिरंगी कलेची दिशा!! ज्यामुळे तो पूर्वीसारखा आता उदास नसतो तर इतरांपेक्षा जास्त आनंदी आणि आत्मविश्वास बाळगून असतो. सुंदर रचनांनी सुखावून टाकणारी ओरिगामी माझ्या मनालाही तितकीच भुरळ पडून जात होती.
सुरुवातीला कित्तीदा तरी लहान मुले चुकतात. काहीवेळा मलाच विसरायला होते कि मी आता काय शिकवत होते ते! (हाहाह). पण शिकावाण्याटला आनंद वेगळाच मिळून जातो. इवल्या इवल्या हातानी ही मोडेल्स बनवताना त्या मुलांच्या डोक्यात काय विचार येत असतील? logically काय घडत असेल नेमके आसे कितीतरी प्रश्न मनात येतात? ओरिगामी मधील छोट्यात छोटी रचना जमली तर लहान मुलेच काय मोठी मोठी माणसे पण किती खुश होतात. कारण काहीही म्हटले तरी "वेगळेपणा" हा निसर्गाचा नियम असल्याने. तो प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला हवाहवासाच वाटतो.
अनिल अवचटांनी तर या गोष्टीचा आनंद कितीदा घेतला असेल असे म्हणून मला त्यांचा तितकाच हेवादेखील वाटतो. "लहान मूल" या विषयावर मी तितकासा विचार आत्तापर्यंत केला नव्हता हे प्रामाणिकपणे मी कबूल करते . पण ओरिगामी निमित्त यावर विचार करायलाच हवा.त्यांची मानसिकता, बौद्धिक क्षमता,मूड यावर खूप अवलंबून असावे. मला वाटते, ओरिगामी ही शास्त्रीय संगीतासारखी असते. म्हणजेच नियमांनी बांधलेली असते. या नियमांचे पालन करणे पुन्हा पुन्हा त्यांच्या मनावर ठसावण्याचे मी शक्य तितके प्रयत्न करते.अनेक मुले ते follow देखील करतात. त्या शिस्तीचा तितकाच "अभिमानही वाटू लागतो त्यांना. कलेला एक प्रकारे "शिस्त" मिळू शकली तर छानच कि! एका कलेत शिस्त पाळायची त्यांना सवय लागली तर ती सगळीकडेच उपयोगी पडेल. त्यांना शाळेत शिकवले जाणारे craft ही ओरिगामी नाही. तर ओरिगामी ही अजून अधिक नियमांना घट्ट धरून आहे. ठराविक चौकटी मध्ये बांधील आहे. कात्रीचा वापर नसल्याने "डोक्याने" ओरिगामी करावी लागते. असे म्हणायला काय हरकत आहे!! मी असेच म्हणेन...!

2 comments:

  1. kya baat hai...
    hats off to you boss

    ReplyDelete
  2. hey, thanks...........aare yahunhi khup khas anubhav milto ya shalanmadhe....
    shabdat na mavnare barech kahi

    ReplyDelete